Image Courtesy : Google Images
परवा मी कोणत्यातरी समाज माध्यमावर एका खूप बोलक्या छायाचित्राने मला अक्षरशः निःशब्द केले..व ते मनाला चटका लावून गेले. इवलीशी एक चिमुरडी हातामध्ये पोस्टर घेऊन उभी होती व त्यावर लिहिले होते, “You will die because of OLD AGE, but we will die because of CLIMATE CHANGE”. निसर्गाचा समतोल राखण्याचा ठेका काही मूठभर पर्यावरणवादी, काही NGOs, काही शासकीय यंत्रणा यांनीच फक्त घेतला नसून,आपण सर्व नक्कीच निसर्गाचे देणे लागतो ह्या भावनेतून ही आपणा सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे असे मला वाटते. आपण येणाऱ्या पिढीसाठी काय मागे ठेवून जाणार आहे याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे..अन्यथा मानवाचा विनाश अटळ आहे…हीच एक वेळ आहे आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करायची…
निसर्गाने अगदी अनादी अनंत कालापासून मानवाला नेहमीच भरभरून दिले आहे, आणि येथून पुढेही तो देतच राहणार…त्याने नेहमीच मानवावर अपार, उत्कट प्रेम केले आहे.तसेच, जेंव्हा जेंव्हा मानवाने निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा आक्राळस्तेपणा केलेला आहे, तेंव्हा तेंव्हा मानवाला त्याची जबर किंमत चुकवावी लागली आहे. या शिकवणीतून आपणाला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या मानवाने लवकरच काहीतरी बोध घेतला पाहिजे, नाहीतर निसर्गचक्राच्या नियमाप्रमाणे ,”ज्या गोष्टीचा उगम आहे, त्याचा अस्तसुद्धा आहे ” या उक्तीप्रमाणे मानवाचा अस्त निकटच आहे.
इम्रान तांबोळी
वारणानगर(कोल्हापूर)
Subscribe to our email newsletter to get the latest posts delivered right to your email.
Comments